इंडियन ओपन पोलो स्पर्धा सुरू

December 5, 2008 1:20 PM0 commentsViews: 6

5 डिसेंबर नवी दिल्ली पवित्रा सझावलपोलो आवडणा-यांसाठी इंडियन ओपन पोलो चॅम्पियनशिप सर्वात महत्त्वाची स्पर्धा समजली जाते. दिल्लीत ही स्पर्धा सुरू झाली असून यात चार टीम्सनं सहभाग घेतला आहे. राजधानी दिल्लीत थंडीची चाहूल लागली आहे. आणि अशा गुलाबी थंडीत देशातली सर्वात जुनी स्पर्धा, इंडियन ओपन पोलो स्पर्धा जयपूर पोलो क्लबमध्ये रंगली आहे. पोलो हा खेळ तसा राजा महाराजांचाच खेळ. तो खेळायला पैसाही अमाप लागतो. आणि त्यामुळेच मध्यमवर्गीय या खेळापासून दूर राहतात. पण आता त्यांनाही या खेळाकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. इंडियन ओपन पोलो ही भारतातली सर्वात जुनी स्पर्धा आहे. यावेळी दिल्लीकरांनीही या स्पर्धेला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे मॉलला जाण्याऐवजी तरुण पिढी पोलो क्लबकडे वळलेली दिसत आहे.

close