पाकिस्तानने नीट वागावं -सोनिया गांधी

January 18, 2013 4:49 PM0 commentsViews: 18

18 जानेवारी

एकीकडे सर्वसामान्य माणूस भ्रष्टाचारानं वैतागलेला असताना तरुण नेत्यांनी संपत्तीचं प्रदर्शन करणं अयोग्य आहे असं मत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी व्यक्त केलं. जयपूरमध्ये आजपासून काँग्रेसचं चिंतन शिबिर सुरू झालंय. आजच्या भाषणात सोनियांनी काँग्रेस नेत्यांना आत्मपरिक्षणाचा सल्ला दिलाय. तसंच महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत त्यांनी मुलींबद्दलची मानसिकता बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सत्तेत असताना सहकारी पक्षांचं म्हणणं ऐकून घ्या पण आपल्या धोरणांशी तडजोड करु नका असंही त्यांनी सांगितलंय. गेल्या 9 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास झाल्याचा दावा सोनियांनी केला. पाकिस्तानकडून चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. यावेळी राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार करावं आणि लवकर निवडणुका घ्यावा अशी सूचना अनेक काँग्रेस नेत्यांनी केली. मित्रपक्षांची संख्या वाढवणं, उत्तर प्रदेश, बिहार आणि तामिळनाडूत संघटन बळकट करणं, मध्यमवर्गीय मतदारांना आकर्षित करणं, महिला सक्षमीकरणावर भर देणं हे मुद्दे चिंतन शिबिराच्या अजेंड्यावर आहेत.

close