कोथरूडमध्ये 6 वाहनं जळून खाक

January 10, 2013 3:38 PM0 commentsViews: 2

10 जानेवारी

पुण्यातील कोथरूड भागातील अभिषेक अर्पाटमेंटमध्ये सहा दुचाकी वाहनं जळून खाक झाली आहे. पार्किंगच्या ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या या मोटरसाईकल्स जळत असल्याचं अर्पाटमेंटमध्ये राहणार्‍या लोकांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने अग्निशमन विभागाला याची माहिती कळवली. काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी हजर झाले.शॉर्टसर्किटमुळे या मोटरसायकलला आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

close