चौटाला पिता-पुत्रांना 10 वर्षांचा तुरूंगवास

January 22, 2013 9:46 AM0 commentsViews: 5

22 जानेवारी

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला आणि त्यांचा मुलगा अजय चौटाला या दोघांना शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर 3 आरोपींनाही 10 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहेत. दिल्लीतल्या रोहिणी कोर्टानं हा निर्णय दिलाय. या निर्णयानंतर चौटालांचे समर्थक आक्रमक झालेत. दिल्लीच्या रोहिणी कोर्टासमोर त्यांच्या हजारो समर्थकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांना अखेर लाठीमार करावा लागला, तसंच समर्थकांना पांगवण्यासाठी अश्रूधुर सोडावा लागला.

मागील आठवड्यात रोहिणी कोर्टाच्या विशेष सीबीआय कोर्टाने चौटाला पित्रा-पुत्रासह 55 जणांना दोषी ठरवलंय. यामध्ये आयईएएस अधिकार्‍याचाही समावेश आहे. सप्टेंबर 1999 रोजी चौटाला सरकारने जेबीटी शिक्षकांच्या 3 हजार 206 पदांसाठी 18 जिल्ह्यात एक समिती नेमून भरती केली होती. पण या भरतीमध्ये 8 हजार उमेदवारांच्या भरतीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर चुकीचे कागदपत्र, दगाबाजी, पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. अखेर या प्रकरणी चौटाला पिता-पुत्रास दहा वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आलाय. याप्रकरणी चौटाला हायकोर्टात धाव याचिका दाखल करणार आहे.

close