नायकवडींनी शाही लग्न पडले महागात, राष्ट्रवादीतून हकालपट्टी

March 2, 2013 9:10 AM0 commentsViews: 4

02 मार्च

सांगली : राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना आपल्या मुलाच्या लग्नासाठी उधळपट्टी करणारे सागंलीचे महापौर इद्रिस नायकवडी यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकीकडे दुष्काळाने महाराष्ट्र होरपळत असताना त्यांनी आपल्या मुलाचं शाही लग्न केलं होतं. आणि जेवणावळीवर लाखोंचा खर्च केला होता. या लग्न सभारंभात गृहमंत्री आर आर पाटील आणि वनमंत्री पतंगराव कदम यांनीही उपस्थिती लावली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय नेत्यांनी पैशांची उधळपट्टी करू नये, असं बजावलं होतं. तरीही राष्ट्रवादीच्याच कार्यकर्ते आणि नेत्यांनी त्यांच्या सल्ल्याला वाटण्याच्या अक्षता दाखवल्या होत्या. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती. विशेष म्हणजे नायकवडी यांच्या अगोदर राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी आपल्या मुलामुलीचे शाही लग्न करून वादाला तोंड फोडले होते. याप्रकरणी इन्कम टॅक्स खात्यांनेही त्यांची चौकशी केली होती. जाधव यांनी माफी मागितल्यामुळे शरद पवारांनी त्यांचा माफीनामा मंजूर करत प्रकरणावर पडदा टाकला होता. पण जाधव यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा नायकवडी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

close