राज ठाकरे यांना शिराळा कोर्टाचा जामीन

February 1, 2013 2:00 PM0 commentsViews: 87

01 फेब्रुवारी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिराळा कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 15 हजार रूपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर राज यांनी जामीन देण्यात आला आहे. जमावबंदी तोडल्याचा राज ठाकरेंवर आरोप होता. 2008 साली राज ठाकरेंना अटक केल्यानंतर शेडगेवाडी इथं मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी दगडफेक,तोडफोड आणि जाळपोळ केली होती. त्यावेळी बत्तीस शिराळ्यातल्या न्यायालयात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज सकाळी राज ठाकरे हेलिकॉप्टरने शिराळा येथे दाखल झाले होते. कोर्टाच्या परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

close