सी.डी.देशमुख स्मारकासाठी शेकपाची निदर्शन

January 30, 2013 2:25 PM0 commentsViews: 5

30 जानेवारीरोह्यातील सी.डी.देशमुख स्मारकाच्या बांधकामातील दिरंगाईबाबत शेकपानं आज रोहा तहसील कार्यालय व नगरपालिकेसमोर निदर्शनं केली. त्याचबरोबर या प्रकरणाची सखोल चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली. स्मारकासाठी आलेला निधी दुसर्‍या कामासाठी वापरण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. सीडी देशमुख यांच्या स्मारकाबाबत होत असलेल्या दिरंगाईचं वृत्त आयबीएन लोकमतनं दाखवलं होतं. या बातमीनंतर शेकापने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतलीय.

close