रणजीत सौराष्ट्राची दाणादाण,148 पहिली इनिंग

January 26, 2013 3:16 PM0 commentsViews: 9

26 जानेवारी

मुंबई आणि सौराष्ट्रदरम्यान आजपासून रणजी ट्रॉफीच्या फायनलला सुरुवात झाली आहे. मॅचच्या पहिल्याच दिवशी मुंबईच्या बॉलर्सनं सौराष्ट्रला दणका दिला. सौराष्ट्रची पहिली इनिंग अवघ्या 148 रन्समध्ये ऑलआऊट झाली. अर्पित वसवडानं हाफसेंच्युरी करत एकाकी झुंज दिली. पण इतर बॅट्समनची त्याला साथ मिळाली नाही. मुंबईच्या धवल कुलकर्णीनं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर अभिषेक नायर आणि विशाल दाभोळकरनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. याला उत्तर देताना मुंबईनं पहिल्या दिवसअखेर बिनबाद 19 रन्स केले आहेत.

close