सेहवागला अखेर डच्चू, हरभजनला संधी

March 7, 2013 10:06 AM0 commentsViews: 72

07 मार्च

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन टेस्टसाठी 14 जणांच्या भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणेच निवड समितीने खराब फॉर्ममध्ये असलेल्या वीरेंद्र सेहवागला डच्चू दिला आहे. तर हरभजन सिंगला मात्र पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. उर्वरीत टीममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये सेहवागची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. त्यामुळे आता मुरली विजयच्या साथीने भारतीय टीमची ओपनिंग कोण करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ओपनर म्हणून अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन टीममध्ये आहेत पण अंतिम 11 मध्ये यापैकी कोणाला संधी मिळते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. पण आपण रिटायरमेंट घेणार नाही. टीममध्ये परतण्यासाठी आपण मेहनत करू असं वीरेंद्र सेहवागनं म्हटलं आहे.

close