ज्येष्ठ लेखिका ज्योत्स्ना देवधर यांचं निधन

January 17, 2013 11:02 AM0 commentsViews: 38

17 जानेवारी

ज्येष्ठ लेखिका जोत्स्ना देवधर यांचं पुण्यात वयाच्या 86 व्या वर्षी वृध्दपकाळाने निधन झालंय. पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी मराठी आणि हिंदी भाषांमध्ये विपुल लिखाण केलं. जोत्स्नाताईंनी 21 कथासंग्रह, 19 कादंबर्‍या, 4 ललितलेख संग्रह, आणि अनेक नाटक लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेली 'घर गंगेच्या काठी' ही कादंबरी विशेष गाजली. महाराष्ट्र साहित्य परिषदेने जेष्ठ साहित्यिक तर अखिल भारतीय भाषा साहित्य संमेलनात भारत भाषा पुरस्कारानं जोत्स्नाताईंचा गौरव केला होता.

close