‘पाकसोबत व्यवहार करणं कठीण’

January 15, 2013 12:07 PM0 commentsViews: 3

15 जानेवारी

पाकिस्तानच्या आगळीकीबद्दल पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. पाकिस्तानी सैनिकांच्या निर्घृण कृत्यानंतर व्यवहार पूर्ववत ठेवणं शक्य नाही अशा स्पष्ट शब्दात पंतप्रधानांनी ठणकावलंय. त्याचबरोबर नियंत्रण रेषेवर जे काही घडलं ते स्वीकारता येणार नाही असंही प्रंतप्रधानांनी पाकिस्तानला सुनावलंय. तसंच पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या क्रूरतेला जे जबाबदार आहेत त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी करताना पाकिस्तान चूक स्वीकारेल ही अपेक्षाही व्यक्त केलीय.

7 जानेवारी पाकिस्तानी सेनेनं युद्धविरामाचे उल्लंघन करून सीमारेषेवर घुसखोरी केली. यावेळी गस्त घालत असलेल्या दोन भारतीय जवानांनी निर्घृण हत्या केली. पाक सैनिक एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी शहीद हेमराज यांचे शिर कापून नेले. पाकच्या या कृत्याचा भारताने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. तर भारतीय लष्करप्रमुख विक्रम सिंग, हवाईदलाचे प्रमुख ब्राऊन यांनी जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिलाय. पाकच्या या कुरापतीमुळे खेळावरही परिणाम झाले आहे. मुंबईत होत असलेल्या हॉकी लीग स्पर्धेतून पाक खेळाडूना परत बोलवण्यात आल्याची माहिती आहे. आता खुद्द पंतप्रधानांना उशीरा का होईना आपली भूमिका स्पष्ट केलीय. विशेष म्हणजे पंतप्रधानांनी आज जरी भूमिका जाहीर केली आहे पण सीमारेषेवर झालेल्या तणावनंतर पाक सैनिकांनी अनेक भारतीय व्यापार्‍यांचे ट्रक अडवले होते. त्यामुळे व्यापार्‍यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहेत.

close