राज ठाकरेंकडे पोलिसानेच दाखल केली ‘FIR’

February 4, 2013 5:28 PM0 commentsViews: 25

04 जानेवारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे एका पोलीस कर्मचार्‍यानंच दाद मागितली आहे. शिवसेनेचे विभाग प्रमुख शशीकांत सावंत यांच्याविरोधात या पोलीस कर्मचार्‍याने राज ठाकरेंकडे तक्रार केली आहे. सावंत आपल्या पत्नीला त्रास देतात आणि आपल्याला धमकावतात, अशी तक्रार या पोलीस कर्मचार्‍याने मुंबईतल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात केली होती. पण स्वत: पोलीस असूनही पोलीस अधिकार्‍यांनी याची दखल घेतली नाही. अखेर त्यानं राज ठाकरेंचा दरवाजा ठोठावला आहे. या पोलीस कर्मचार्‍याला न्याय मिळवून देण्यासाठी आता मनसेचा विधी विभाग कामाला लागला आहे. याबाबत शशीकांत सावंत यांच्याशी संपर्क साधला असता हा आपल्या बदनामीचा डाव असून हे दाम्पत्य आपल्याला ब्लॅकमेल करीत आहे आणि या विरोधात आपणही कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सावंत यांनी सांगितलं.

close