हैदराबादमध्ये 2 बॉम्बस्फोट, 12 ठार

February 21, 2013 1:59 PM0 commentsViews: 41

21 फेब्रुवारी

आंध्रप्रदेशची राजधानी हैदराबादमधल्या दिलसुखनगर भागात आज संध्याकाळी दोन बॉम्बस्फोट झाले. अत्यंत गर्दीच्या ठिकाणी हे स्फोट झाले आहे. या स्फोटात 12 जण ठार तर 57 हून अधिक जण जखमी झाले अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. तसंच आम्हाला 2 दिवसांपूर्वी स्फोटांची माहिती मिळाली होती, पण नेमके कोठे होणार याबद्दल माहिती नव्हती अशी कबुलीही शिंदे यांनी दिली. तर मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीय. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीय. यानंतर आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला.

शहराबाहेर अत्यंत गर्दीने गजबजलेल्या दिलसुखनगर भागात संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी वेंकटाद्री या सिनेमागृहाजवळ पहिला स्फोट झाला. यानंतर काही सेकंदातच कोणार्क सिनेमागृहाजवळ स्फोट झाला. या दोन्ही सिनेमागृहात फक्त 500 मिटरचे अंतर होते. गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटकं सायकलीच्या कॅरिअरवर ठेवण्यात आली होती. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार या दोन्ही भागात स्फोटाचा प्रचंड मोठा आवाज झाला. घटनास्थळावर डॉग स्क्वॉड, बॉम्ब शोध पथक दाखल झाले. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेऊन संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. घटनास्थळावर आध्रप्रदेशचे मुख्यमंत्री किरण रेड्डी यांनी धाव घेतली. जखमींना 35 जणांना ओस्मानिया हॉस्पिटल, 12 जखमींना यशोदा हॉस्पिटल ओम्नी हॉस्पिटलमध्ये 15 जणांना दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे दिल्ली, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

साखळी स्फोटाने हैदराबाद हादरले – संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी झाला पहिला स्फोट- 12 ठार, 57 हून अधिक जखमी – अत्यंत गर्दीच्या ठिकाणी स्फोट- कोणार्क आणि वेंकटाद्री या सिनेमागृहाजवळ दोन स्फोट- संपूर्ण परिसरात नाकाबंदी- दिल्ली, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशात हाय अलर्ट जारी – यशोदा हॉस्पिटलमध्ये 12 जखमींवर उपचार सुरु- ओस्मानिया हॉस्पिटलमध्ये 35 जखमींवर उपचार सुरु- ओम्नी हॉस्पिटलमधे 15 जखमींवर उपचार सुरु- आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री किरण रेड्डी घटनास्थळी – NIA चे अधिकारी घटनास्थळाकडे रवाना

- डॉग स्क्वॉड, बॉम्ब शोध पथक घटनास्थळी

close