मुंबईवरील हल्ल्यात गुप्तचर यंत्रणा अपयशी – गृहमंत्री

December 5, 2008 11:46 AM0 commentsViews: 2

5 डिसेंबर, मुंबई मुंबईवर झालेले दहशतवादी हल्ले म्हणजे गुप्तचर यंत्रणांचं अपयश होतं, अशी कबुली केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिलीय. गृहमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यादांच मुंबई भेटीवर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. शिवाय हल्ल्यानंतर त्यात बळी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांना राज्य सरकारनं जी काही आश्वासनं दिली आहेत, त्याची येत्या डिसेंबर अखेरपर्यंत अंमलबजावणी करावी, अशी सूचना त्यांनी राज्याच्या गृहसचिवांना केली. त्यांनी हल्ल्यातील मृतांना आणि शहीद झालेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहिली तसंच पोलीस कॉन्स्टेबल विजय खांडेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.

close