12 लाख विद्यार्थ्यांवर 245 पथकांची नजर

February 18, 2013 4:00 PM0 commentsViews: 9

18 फेब्रुवारी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळात यावर्षी 12 लाख 94 हजार 363 विद्यार्थी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा देत आहेत. दोन हजार 322 केंद्रावर या परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. परीक्षा पारदर्शक पध्दतीने पार पडावी याकरिता 245 भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.21 तारखेला केंद्रीय कामगार संघटनानी भारत बंदचा इशारा दिला आहे. त्याचा परिक्षेवर परिणाम होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बेस्ट बसेस, राज्य परिवहन मंडळाच्या बसेस आणि रेल्वे सुविधा सुरु ठेवण्यात येणार आहेत. तसेच शिक्षण संस्था चालकांनी HSC परिक्षेवरील बहिष्कार मागे घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

close