प्राध्यापकांचा बहिष्कार कायम, परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की

March 5, 2013 10:46 AM0 commentsViews: 35

05 मार्च

सीनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांचा उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार कायम आहे. 8 मार्चला प्राध्यापक जेलभरो आंदोलन करणार आहेत. एम फुक्टोचे प्राध्यापक 8 मार्चला आंदोलन करणार आहेत. या आंदोलनामुळे परीक्षांवर परिणाम झाला आहे. राज्यातल्या आठ विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या सर्व कॉलेजेसमधल्या परिक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. प्राध्यापकांच्या संपाला आता एक महिना पूर्ण होऊनही अद्यापही सरकारकडून यावर तोडगा काढण्याचे कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. दरम्यान, मुंबईत टी.वाय.बीएससीची प्रॅक्टिकल्स पुढे ढकलण्यात आले आहे. विद्यापीठातही अनेक ठिकाणी परीक्षा पुढे ढकलाव्या लागतील अशी माहिती बुक्टूंचे सचिव मधू परांजपे यांनी दिली.

close