दुष्काळग्रस्तांना आंदोलन करण्यापासून अटकाव

January 17, 2013 11:40 AM0 commentsViews: 9

17 जानेवारी

सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्याला सलग दुसर्‍या वर्षीही दुष्काळाला सामोरं जावं लागतंय. पाण्यासाठी आणि चार्‍यासाठी लोकांना भटकंती करावी लागतेय. अशात आटपाडीचे तहसिलदार जोगेंद्रसिंह कट्यारी यांनी 144 कलम जमाव बंदी लागू केलीय. या कलमानुसार तहसील कार्यालयाच्या शंभर मीटर आवारात आंदोलन करायला मज्जाव करण्यात आलाय. यामुळे दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी आपली जनावरे आटपाडी पंढरपूर रस्त्यावर बांधली आहेत. राज्य सरकारनं जनावरांच्या चार्‍यासाठी अनुदान कमी केलंय. मोठ्या जनावरांसाठी 80 रुपयांवरुन 60 रुपये, तर लहान जनावरांसाठी 60 रुपयांवरुन 30 रुपये अनुदान देण्याचा देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यामुळे शेतकरी जनावरांसह आंदोलन करत आहेत. नागपुरात दुष्काळी भागाची माहिती घेण्यास सुरूवात

तर विदर्भातील बुलढाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यामधील अनेक गावांमध्ये दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे. या भागांकडे सरकारनं कोणतंही लक्ष दिलेलं नाहीये. तर नागपूर विभागात उशिरा का होईना सरकारने दुष्काळग्रस्त भागाची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. विभागातील 23 तालुक्यांमधील तब्बल 124 गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. या गावांमध्ये 50 पैशांपेक्षा कमी आणे वारी आहे. हिवाळ्यानंतर पाण्याची समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे.

close