रेल्वे प्रवास महागणार ?

February 25, 2013 9:14 AM0 commentsViews: 4

25 फेब्रुवारी

महागाईची 'गाडी' ओढणार्‍या सर्वसामान्यांना आता आणखी एक धक्का बसणार आहे. संसदेत उद्या रेल्वे बजेट सादर होणार आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेभाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. डिझेलची दरवाढ झाल्यामुळे उत्पादनातील तूट भरुन काढण्यासाठी ही दरवाढ केली जाणार असल्याची माहिती मिळतेय. या दरवाढीत प्रवासी सुविधांवर अधिभार लावला जाण्याची शक्यता आहे. तर रेल्वेची कामं ही रोजगार हमी योजनेअंतर्गत केली जाणार आहेत. इतकचं नाही तर मुंबई दिल्ली दरम्यान, आणखी एक राजधानी एक्स्प्रेस सुरु केली जाणार असल्याचंही कळतंय.

close