मरोळमध्ये मेट्रो पुलाचा भाग कोसळून 3 ठार

February 7, 2013 10:52 AM0 commentsViews: 4

07 फेब्रुवारी

मंुबईत अंधेरी पूर्वेकडील मरोळ येथे बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सहार एअरपोर्टजवळ बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पुलाचा काही भाग कोसळला. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला. तर 7 जण जखमी झाले. सहार एअरपोर्टजवळ ग्रण्ड हयात हॉटेलसमोर सुरू असेलेल्या मेट्रो पुलाचा 50 मिटरचा भाग अचानक कोसळला आणि एकच धावपळ उडाली. तातडीने अग्निशमन दलाला याबाबत माहिती कळवण्यात आली. घटनास्थळी तातडीने 10 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढीगार्‍याखालून सात जणांना बाहेर काढलं. जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

close