…तर परप्रांतीय फेरीवाल्यांना ‘खळ्ळ फटॅक’-राज

January 15, 2013 1:24 PM0 commentsViews: 13

15 जानेवारी

पोलीस प्रशासन, व्यवस्थेविरोधात फेरीवाल्यांनी मोर्चा काढून आपली ताकद दाखवली तर त्या दिवशी आणि त्यादिवसानंतर फुटपाथवर प्रत्येक परप्रांतीय फेरीवाल्यांना 'खळ्ळ फट्यॉक'नं उत्तर दिलं जाईल असा थेट इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय. तसंच सगळे फुटपाथ या फेरवाल्यांनी भरून गेले आहे. हे दुष्टचक्र तोडण्यासाठी आता पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. हे थांबवण्यासाठी परप्रांतीय फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करू नका असं आवाहनही राज यांनी केलं.

राज ठाकरे यांचा पुढील महिन्यात 10 तारखेपासून राज्यव्यापी दौरा सुरू होणार आहे या दौर्‍याबाबत माहिती देण्यासाठी राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी 'कृष्णकुंज'वर पत्रकार परिषद घेऊन माहिली दिली. यावेळी एसीपी वसंत ढोबळे यांच्या बदलीवर राज यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ' आझाद मैदानावर जो प्रकार घडला. त्यानंतरही पोलिसांचं मानसिक खच्चीकरण करणं एवढाचं उद्योग सध्या राज्यात सुरू आहे. प्रश्न ढोबळेंना परत आणणे नाही. पण या अनधिकृत परप्रांतीय फेरीवाल्यांवर जर कारवाई होत असले आणि त्यानंतर पोलीस अधिकार्‍याची बदली होत असले तर कोणत्या पोलीस अधिकार्‍यांने कारवाई करावी ? फेरीवाले हटवायचे नाही. उलट त्यांनाच पोसत बसायचे आणि कोणी कारवाई केली की, अधिकार्‍याची बदली करायची. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, ठोबळेंवर कारवाई ही मुख्यमंत्र्यांचा अधिकार अंतर्गत झालीय. मग मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढण्याचं जाहीर केलं. तेव्हा त्यांचा निर्णय का पटला नाही? राजीनामा का दिला ? गृहखाते राष्ट्रवादीकडेच आहे मग ढोबळेंच्या कारवाईवर आक्षेप का घेतला नाही ? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

'मराठी माणसाचा पहिला अधिकार, परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेणार नाही'या फेरीवाल्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे एक प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावात ज्या शहराची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या 2 टक्के संख्या फेरीवाल्यांची असावी असं काही नमूद केलंय. जर मुंबईची लोकसंख्या पाहिली तर रस्त्यावर फेरीवाल्यांचे बस्तानाच बसेल. जायला सुद्धा जागा उरणार नाही. मुळात महापालिका प्रशासनाने जे अनधिकृत आहे ते तोडलंच पाहिजे. त्यातही मराठी फेरीवाले आणि परप्रांतीय असा दुजाभाव केला जातो आणि आपली व्होट बॅक राखण्यासाठी काँग्रेसचे नेते परप्रांतीयांना पाठीशी घालतात असा आरोपही राज यांनी केला. परप्रांतीयांचे लोढेंच्या लोढे येणार इथं सगळे फुटपाथ हडपणार आणि अनेक वर्षांपासून आपले मराठी फेरीवाले तिथं व्यवसाय करतात त्यांच्यावर ही लोकं दादागिरी करतात. मराठी माणसांचा हा पहिला अधिकार आहे. परप्रांतीयांनी फेरीवाले बनू नये याला माझा विरोध नाही. पण मराठी माणसाचा हक्क मारून जर घेतलं जात असेल तर त्याविरोधात बोलावेच लागेल आणि त्याला उत्तर दिलेच जाईल असं राज यांनी ठणकावून सांगितलं.

भारत-पाक राजकारणाचे सैनिक बळी ?

भारत पाकिस्तान सीमेवर आपले जवान शहीद होतात हे खरेच शहीद होतात की बळी पडतात ? भारत-पाक यांच्यात होत असलेल्या राजकारणामुळे हे जवान बळी पडत आहे का ? काही तरी अंगावर आल्यावर मग हालचाल सुरू करायची असा प्रकरणाचा मोठा 'इशू' करायचा आणि मुळ विषयाला बगल द्यायाची असा प्रकार सुरू आहे. आपले लष्करप्रमुख म्हणतात, यानंतर कारवाई झाली तर जशास तसे उत्तर देऊ असं सांगतात. मग याअगोदर जे झालं त्याचं काय ? आपले जवान हे राजकारणाचे बळी आहे असा आरोपही राज यांनी केला. एवढे होऊन सुद्धा खेळाचे सामने होतात एवढीच जर खुमखुमी असेल तर बंद पाडून दाखवा असंही राज म्हणाले.

close