ठाण्यात तरूणीवर राहत्या घरी हल्ला

January 19, 2013 10:18 AM0 commentsViews: 2

19 जानेवारी

दिल्लीत सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय पण महिला अत्याचाराचे प्रमाणात काही घट होताना दिसत नाही. ठाण्यामध्ये एका 22 वर्षिय तरुणीवर तिच्या राहत्या घरी हल्ला झाल्याची घटना घडलीये. तीन जणांनी हा हल्ला केल्याचं समजतंय.या हल्लेखोरांनी तरुणीचा भाऊ आणि वडिलांना मारहाण केली. या प्रकरणी तिंघाना अटक करण्यात आली आहे. कासारवडवली पोलीस ठाण्यात या तिनही आरोपींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जखमी मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना उपचारांसाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.

close