हैदराबाद स्फोटांमागे इंडियन मुजाहिद्दीन ?

February 21, 2013 6:12 PM0 commentsViews: 6

21 फेब्रुवारी

हैदराबादमधल्या दिलसुखनगर भागात झालेल्या स्फोटाबाबतच्या हालचालींची माहिती दोन दिवसांपूर्वीच मिळाली होती पण त्याबाबतची पक्की माहिती मिळत नव्हती अशी कबुली केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. पण काही दिवसांपूर्वी इंडियन मुजाहिद्दीनच्या संशयितांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून याबाबतची माहिती पुढे आली होती. त्या आशयाची कागदपत्रं आयबीएन नेटवर्कवच्या हाती लागली आहेत. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात या संशयितांची चौकशी करण्यात आली होती. त्यात त्यांनी दिलसुखनगर भागाची रेकी केल्याचं कबुल केलं होतं. पण ही सगळी माहिती हैदराबाद पोलिसांना दिली गेली होती की नाही, याबाबत मात्र कुठलीच माहिती समोर येत नाही.

close