नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार ?

February 2, 2013 9:43 AM0 commentsViews: 17

02 फेब्रुवारी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. काल भाजपच्या कोअर कमेटीच्या बैठकीनंतर या चर्चेनं पुन्हा एकदा जोर धरला आहे. या बैठकीत मोदींच्या नावाची चर्चा झाल्याचं बोललं जातंय. या आधीही राम जेठमलानी, यशवंत सिंन्हा यांच्यासह काही नेत्यांनी मोदींचं नाव घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र जेडीयुचा याला विरोध आहे. दरम्यान, मोदींचं नाव थेट पंतप्रधानपदासाठी घोषित न करता त्यांना प्रचार समितीचं प्रमुखपद देवून मोदींचा राष्ट्रीय पातळीवर प्रवेश घडवून आणावा, असंही काही भाजप नेत्यांचं मत आहे.

close