मच्छीमारांचे चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच

January 24, 2013 11:49 AM0 commentsViews: 23

24 जानेवारी

डिझेल दरातल्या वाढीच्या निषेधार्थ कोकणातला मासेमारी व्यवसाय सलग चौथ्या दिवशीही ठप्प आहे. राज्यातल्या सर्व मच्छीमार सोसायट्यांनी डिझेल खरेदी बंद केली असून देवगड मालवण आणि वेंगुर्ल्यातल्या मच्छीमारांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहेत. याबाबत महाराष्ट्र मच्छीमार कृती समितिने राज्यातल्या सर्व मच्छीमार सोसायट्यांची उद्या कुलाबा येथे सभा बोलावलीय. मच्छीमारांसाठी देण्यात येणार्‍या डिझेल दराबाबत राज्याने केंद्राकडे चर्चा करून यातून मार्ग काढला नाही तर उद्या होणार्‍या सभेत मच्छीमारांच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.

close