नगरमध्ये 3 वर्षात दलित अत्याचाराच्या पाच घटना उघड

January 30, 2013 5:14 PM0 commentsViews: 27

30 जानेवारी

अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासे तालुक्यातल्या सोनई गावातल्या तिहेरी हत्याकांडांचं प्रकरण उजेडात आलं असलं तरी, गेल्या तीन वर्षात दलित अत्याचाराच्या तब्बल पाच गंभीर घटना घडल्या आहेत. आणि त्यातल्या पीडितांना अजूनही न्याय मिळालेला नाही. सामूहिक बलात्कार, जिवंत जाळणं, घरं जाळणं अशाप्रकारच्या पाच गंभीर घटना घडल्या आहेत आणि या पाचही घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या आहेत. कोपरगाव, अकोले, कर्जत आणि श्रीगोंदे तालुक्यात या घटना घडल्या आहे.

अहमदनगर जिल्ह्यात इथं घडल्या घटना

- कोपरगाव, अकोले, कर्जत आणि श्रीगोंदे तालुक्यात अत्याचाराच्या घटना- कोपरगाव तालुक्यातल्या पोहेगावात गणेश गोरे या तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न- गणेश गोरेचं घर जाळलं, घरच्यांना बेदम मारहाण- अकोले तालुक्यात वीरगाव इथल्या आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार- कर्जत तालुक्यातल्या बाभूळनगर इथं बौद्ध वस्तीवर हल्ला- वस्तीवरच्या हल्ल्यात जनाबाई ठोंबरे यांना जिवंत जाळलं – श्रीगोंदे तालुक्यात तालुक्यातल्या धारगाव इथं दीपक कांबळे याचा खून करण्यात आला- लिंपनगाव इथं भटक्या-विमुक्त दलित समाजातल्या लोकांची घरं जाळली

close