अर्थसंकल्प :संरक्षणावर कोसळणार आर्थिक कपातीचा ‘बॉम्ब’?

February 27, 2013 4:02 PM0 commentsViews: 15

उदय जाधव, मुंबई

27 फेब्रुवारी

उद्याच्या अर्थ बजेटमध्ये सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे ती संरक्षण विभागाला..संरक्षण विभागाला मिळणार्‍या निधीमध्ये, तब्बल दहा हजार कोटी रुपयांची कपात करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शस्त्रास्त्र खरेदी व्यवहारांवर परीणाम होऊ शकतोय.

आर्मी…नेव्ही…एअर फोर्स… आणि या दलांसाठी महत्त्वाच्या असणार्‍या डीआरडीओला सध्या एकच समस्या भेडसावतेय ती म्हणजे वेळेवर न मिळणार्‍या आर्थिक पाठबळाची. लष्काराने केलेले शस्त्र खरेदीचे करार आणि त्यात भ्रष्टाचाराचे आरोप, त्यामुळे शस्त्र मिळवण्यास होणारा उशीर यामुळे लष्कराच्या संरक्षण सिद्धतेवर परिणाम होतोय.

बोफोर्स तोफा असोत किंवा सध्या गाजत असलेला ऑगस्टा वेस्टलॅड चॉपर खरेदी व्यवहार..भ्रष्टाचाराचे आरोप झाले की संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट केले जाते, आणि मग करार अर्धवट राहिल्यानं शस्त्रास्त्रांचे सुटे भाग मिळवण्यापासुन ते शस्त्र खरेदी अपुर्ण राहण्यापर्यंत अनेक अडचणी निर्माण होतात.

या संरक्षण विभागाच्या चारही दलांना सक्षम ठेवायचं असेल तर कोणतीही तडजोड न करता एकतर शस्त्रास्त्र खरेदी व्यव्हार वेळेवर पूर्ण केले पाहिजेत किंवा भारताने स्वबळावर शस्त्र निर्माण केले पाहिजे. पण त्यासाठी आवश्यकता आहे ती प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि आर्थिक पाठबळाची…

एकीकडे चीन आणि पाकिस्तान मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र खरेदी करुन आपली संरक्षण सिद्धता वाढवत आहेत. तर भारत मात्र आपल्या संरक्षण दलाचं बजेट दहा हजार कोटी रुपयांनी कमी करुन, लष्काराच्या सक्षमीकरणात अडथळा निर्माण करत आहे. संकटं कधीच सांगुन येत नाहीत. त्यामुळे लष्कर जर सक्षम असेल तर येणार्‍या कोणत्याही संकटाचा सामना खंबीरपणे करता येईल.

संरक्षण दलाचं बजेट- आर्मी, नव्ही, एअर फोर्स,डीआरडीओ (DRDO)- मागणी तसा पुरवठा नाही- रखडणारे करार…- तात्रिंक दृष्ट्या पिछाडीवर- चीन, पाकिस्तान आघाडीवर- लष्काराच्या बजेटशी तडजोड नको

close