‘निर्भया’ला अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय मरणोत्तर धैर्य पुरस्कार

March 5, 2013 10:58 AM0 commentsViews: 20

05 मार्च

दिल्लीमधल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या अत्याचारित तरुणीला अमेरिकेचा मरणोत्तर आंतरराष्ट्रीय धैर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहेत. 8 मार्चला अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा आणि परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. 'निर्भया ' आणि तिच्या कुटुंबीयानं या प्रसंगाशी दिलेल्या लढ्यामुळे लाखो भारतीय स्त्रियांना बलात्काराचा कलंक पुसून न्यायासाठी लढा देण्याचं बळ लाभलं असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी या पुरस्काराची घोषणा करताना म्हटलं. पीडित तरुणीसह जगभरातल्या 10 महिलांची या पुरस्कारासाठी निवड झाली. गेल्या वर्षी 16 डिसेंबरच्या रात्री तिच्यावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार झाला होता, तसेच तिला अमानुष मारहाणही करण्यात आली होती. तिचा 29 डिसेंबरला मृत्यू झाला होता.

close