शरद पवारांवर पुण्यात किती गुन्हे दाखल ?

March 13, 2013 10:57 AM0 commentsViews: 135

13 मार्च

दिल्ली : केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची माहिती पुणे पोलिसांनी मागवली आहे. उत्तर प्रदेशातल्या राजकीय नेत्यांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षेवरून एका व्यक्तीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यात त्यानं केंद्रीय मंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती मागितली होती. ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत त्यांनासुद्धा सरकार सुरक्षा पुरवते का असाही प्रश्न त्यानं विचारला होता. त्यावर सुप्रीम कोर्टाने केंद्रीय मंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची आणि त्यांच्या वैयक्तिक पार्श्वभूमीची माहिती गृहमंत्रालयाकडे मागितली होती. त्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयाने संपूर्ण देशातील संबंधित पोलीस आयुक्तांकडून माहिती मागवली होती. त्यानुसारच शरद पवार यांची माहिती पुणे पोलिसांनी मागवलेली आहे.

close