पाकिस्तानच्या पंतप्रधानांना अटक करण्यास ‘नॅब’चा नकार

January 17, 2013 12:06 PM0 commentsViews: 5

17 जानेवारी

पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांना दिलासा मिळालाय. अश्रफ यांनी अटक करायला पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी यंत्रणेचा भाग असलेल्या नॅशनॅलिटी अकाऊंटीलिटी ब्युरोनं नकार दिला आहे. अश्रफ यांच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्यानं त्यांना अटक करता येणार नाही असं नॅबनं सुप्रीम कोर्टाला सांगितलंय. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं आता या खटल्याच्या सर्व फाईल्स परत मागवल्या आहे. तसंच पुराव्यांबाबत पुन्हा अभ्यास केला जाणार आहे. दरम्यान धार्मिक तारीक उल कादरी यांच्याशी चर्चा करण्यासाठी आता पाकिस्तान सरकारनं प्रयत्न सुरू केलेत. त्यासाठी एका खास टीमची स्थापना करण्यात आलीय.

दरम्यान, पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री शेरी रेहमान यांच्याविरोधातली याचिका सुप्रीम कोर्टानं दाखल करून घेतलीय. ब्लास्फेमी म्हणजेच ईश्वरनिंदा कायद्याबद्दलची ही याचिका आहे. पाकिस्तानतल्या ब्लास्फेमी कायद्यात सुधारणा व्हायला हवी, असा प्रस्ताव शेरी रेहमान यांनी काही वर्षापूर्वी पाकिस्तान संसदेत आणला होता. त्यानंतर शेरी रेहमान आणि सरकारवर अनेकांनी टीका केली. त्यामुळेच पंजाबचे गव्हर्नर सलमान ताशीर आणि मंत्री शाबाज भट्टी यांची हत्या झाली. आणि दबावानंतर हे सुधारणा विधेयक मागे घेण्यात आलं. पण आज पाकिस्तानात अस्थिरतेचं वातावरण असतानाच नेमकं सुप्रीम कोर्टानं शेरी रेहमान यांच्याविरोधातली याचिका दाखल करून घेतलीय. हा निर्णय नेमका आता का घेण्यात आला याविषयी चर्चा सुरू झालीय.

close