शरद पवारांना कोलकाता कोर्टाचा दिलासा

December 5, 2008 4:10 PM0 commentsViews: 11

5 डिसेंबर कोलकाताबीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि तीन सदस्यांना जगमोहन दालमियांनी दाखल केलेल्या खटल्यासंदर्भात कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. कोलकाता हायकोर्टाने दिलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. कोलकाता हायकोर्टाने शरद पवार यांच्यासह बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष शशांक मनोहर, सेक्रेटरी श्रीनिवासन आणि बोर्डाचे सीएओ रत्नाकर शेट्टी या चौघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश गेल्या महिन्यात दिले होते. जगमोहन दालमियांविरुद्ध बनावट प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केल्याचा आरोप दालमिया यांनी केला होता.आणि त्यासंदर्भातच कोलकाता हायकोर्टाने हे आदेश दिले होते. 1996 साली वर्ल्डकपच्या आयोजनादरम्यान बोर्डाच्या पैशाची अफरातफर केल्याचा आरोप दालमिया यांच्यावर बोर्डाच्या नव्या मंडळाने केला होता. आणि दालमियांना दोन वर्षासाठी बडतर्फही केलं होतं.

close