विहिरीत पडून दोन बिबट्यांचा मृत्यू

February 7, 2013 11:40 AM0 commentsViews: 3

07 फेब्रुवारी

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव इथे विहिरीत पडून 2 बिबट्यांचा मृत्यू झाला. हे बिबटे झटापट करताना विहिरीत पडले असावेत असा वनविभागाचा अंदाज आहे. हे दोन्ही नर बिबटे असून एक 10 वर्षांचा तर दुसरा 8 वर्षांचा आहे. हे बिबटे पाणी आणि खाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत होते. गेल्या महिनाभरात या परिसरात 4 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.

close