‘गोर्‍या साहेबां’चं लोटांगण, भारताचा दणदणीत विजय

January 15, 2013 2:32 PM0 commentsViews: 5

15 जानेवारी

भारत आणि इंग्लंड दरम्यान कोची येथे झालेल्या दुसरे वन डे मॅचमध्ये भारतानं इंग्लंडचा 127 रन्सनं दणदणीत पराभव केलाय. या विजयाबरोबरच भारतानं पाच वन डे मॅचच्या सीरिजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधलीय. कॅप्टन धोणी, रविंद्र जडेजा आणि सुरेश रैनाच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतानं इंग्लंडसमोर 286 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. पण याला उत्तर देताना इंग्लंडची टीम 158 रन्सवर ऑलआऊट झाली. शमी अहमदनं इयान बेलला आऊट करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. या धक्क्यातून इंग्लंडची टीम सावरलीच नाही. भुवनेश्‍वर कुमारनं कॅप्टन कुक, केविन पीटरसन आणि इयान मॉर्गेनला आऊट करत विजयाचा मार्ग मोकळा करुन दिला.

close