छेडछाडीला कंटाळून पेटवून घेणार्‍या मुलीचा मृत्यू

January 12, 2013 4:18 PM0 commentsViews: 5

12 जानेवारी

मुलाने छेड काढल्यामुळे स्वत:ला पेटवून घेणार्‍या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. पारगावच्या कन्या प्रशालेत शिकणार्‍या या मुलीला वर्गातल्या मुलाने छेड काढल्याचा राग अनावर झाला आणि तिनं स्वत:ला पेटवून घेतलं होतं. त्यात ती 65 टक्के भाजली होती. आधी बीडच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिची प्रकृती अधिकच खालवल्याने तिला औरंगाबादला हलवण्यात आलं होतं. तिथेच तिचा मृत्यू झाला. दरम्यान छेड काढणार्‍या मुलाला पोलिसांनी अटक केली असून उस्मानाबाद इथल्या बाल सुधारगृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे.

close