‘सोनई हत्याकांडाची सीआयडीमार्फत चौकशी करा’

February 5, 2013 9:40 AM0 commentsViews: 10

05 फेब्रुवारी

सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत करावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार मोहन जोशी यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या हत्याकांडातील इतर आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्यात यावा, या खटल्याची सुनावणी जिल्ह्याबाहेर व्हावी आणि या केससाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक व्हावी अशा मागण्या आमदार जोशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागण्यांबाबत सहमती दाखवली आहे अशी माहितीही जोशी यांनी दिली.

close