‘राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार करा’

January 19, 2013 10:38 AM0 commentsViews: 3

19 जानेवारी

जयपूरमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात काँग्रेसचे महासचिव विलास मुत्तेमवार यांनी राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची मागणी केली आहे. पण राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याबाबत काँग्रेसमध्येच दोन गट असल्याचं दिसतंय. तरुण मंत्री राहुल गांधींना पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी पाठिंबा देत आहे. तर पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. यासंदर्भातील निर्णय हा राहुल गांधींवर सोडा असा सल्ला त्यांनी दिला आहे. आज संध्याकाळी 6 वाजता काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे.

close