मुलुंड झोपडपट्टी जाळपोळ प्रकरणी दोन आमदारांना अटक

January 22, 2013 10:19 AM0 commentsViews: 24

22 जानेवारी

मुलुंड झोपडपट्टी जाळपोळ प्रकरणी मनसेचे आमदार शिशिर शिंदे आणि भाजपचे आमदार सरदार तारा सिंग यांना अटक करण्यात आली आहे.आत्तापर्यंत या प्रकरणात एकूण 17 जणांना अटक करण्यात आली आहे. आज या अटकेनंतर आमदार शिशिर शिंदे,आमदार सरदार तारासिंग आणि किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. याप्रकरणात त्यांच्यावर दंगल, जाळपोळ, मालमत्तेचे नुकसान करणे असे गुन्हे लावण्यात आले आहे. या अटकसत्राविरोधात मुलुंडमधील स्थानिक नागरीक मुलुंड बंदची हाक देऊ शकतात अशी माहिती मिळते आहे. रविवारी अनधिकृत झोपडपट्‌ट्या हटवण्यात आल्यात. यावेळी शिशिर शिंदे आणि सरदार तारा सिंग यांच्या समर्थकांनी झोपडपट्‌ट्यांना आग लावली.

close