हैदराबाद बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या 16 वर

February 22, 2013 11:05 AM0 commentsViews: 9

22 फेब्रुवारी

हैदराबादमध्ये दिलसुखनगर भागात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमधील मृतांची संख्या 16 वर गेली आहे तर 118 जण जखमी झाले आहेत. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ही माहिती दिली. शिंदे यांनी आज सकाळी घटनास्थळाची पाहणी केली, तसंच जखमींची विचारपूस केली. मृतांपैकी 12 जणांची ओळख पटली आहे. त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दिलसुखनगर हा हैदराबादमधला अत्यंत गर्दीचा परिसर आहे. संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास हे स्फोट झाला.

close