मनसेनं टोल नाक्यांचं आंदोलन का गुंडाळलं ?-जावडेकर

March 11, 2013 9:30 AM0 commentsViews: 6

11 मार्च

विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे सकाळी घोटाळे उघड करतात आणि संध्याकाळी सेटलमेंट करतात असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर भाजपला हा आरोप चांगलाच झोंबला. आमच्यावर सेटलमेंटचा आरोप करण्याऐवजी राज ठाकरेंनी टोलविरोधातलं आंदोलन का थांबवलंत्याचं उत्तर द्यावं असं प्रतिआव्हान भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी दिलं आहे.ते अहमदनगरमध्ये बोलत होते. मनसेनं टोल नाक्याच्या प्रश्नावर राज्यभरात आंदोलन पुकारले होते. अनेक टोलनाक्यांची तोडफोड केली होती. तर टोल देऊ नका असं आवाहन खुद्द राज ठाकरे यांनी केलं होतं. तसेच राज यांच्या आदेशावरून अनेक टोलनाक्यावर मनसेसैनिकांनी टोल नाक्यावर पहारा देऊन येणार्‍या जाणार्‍या गाड्यांची संख्या नोंदवली होती पण यानंतर अचानक आंदोलन नाहीसे झाले.

close