मच्छीमारांसाठी डिझेलच्या दरात 7 रूपयांना कपात

February 2, 2013 10:01 AM0 commentsViews: 8

02 फेब्रुवारी

डिझेलच्या दरवाढीमुळे हवालदील झालेल्या मच्छीमारांना पेट्रोलियम मंत्रालयाने दिलासा दिला आहे. मच्छीमार सोसायट्यांना मिळणार्‍या डिझेल दरात पेट्रोलियम कंपन्यांनी केलेली 11 रूपये 20 पैशांची दरवाढ कमी करण्याचा निर्णय पेट्रोलिय मंत्रालयाने घेतला आहे. ही दरवाढ आता 7 रुपयांनी कमी करून 3 रूपये 56 पैशांवर आणण्यात आली आहे. मात्र ही दरवाढही परवडणारी नसल्याचं मच्छीमार संघटनांचं म्हणणं आहे.त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेलं मासेमारी बंदचं आंदोलन पुढेही चालुच ठेवण्याचा निर्णय या मच्छीमार संघटनांनी घेतला आहे.

close