सुदाम मुंडे आतापर्यंत एकदाच कोर्टात हजर

March 5, 2013 11:20 AM0 commentsViews: 22

05 मार्च

संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्‍या स्त्री भ्रूण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ.सुदाम मुंडे आतापर्यंत खटल्याच्या सुनावणीसाठी एकदाच कोर्टात हजर राहिले. त्यामुळे कोर्टाने वारंवार सांगूनही डॉ. मुंडे यांना कोर्टात हजर केलं नाही. याउलट कारागृह अधिक्षकांनी मुंडे यांना हजर न करण्याबाबतची वेगवेगळी स्पष्टीकरणं दिली आहे. त्यामुळे परळीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी नाशिक कारागृह अधिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच 11 मार्च रोजी सुनावणीसाठी डॉ.मुंडे यांना हजर करण्याचे आदेश दिले आहेत. मुंडे यांना कोर्टात हजर न करण्याच्या प्रकारामुळे कारागृह प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

close