राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन

February 27, 2013 4:51 PM0 commentsViews: 25

27 फेब्रुवारी

अहमदनगरमध्ये काल रात्री साडे अकराच्या सुमाराला मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि दगडफेक झाली. मंगळवारी रात्री झालेल्या या राड्याचे पडसाद आज दिवसभर राज्यभरात उमटले. कोकणापासून विदर्भापर्यंत मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला टार्गेट केलं. दरम्यान,मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एक निवेदन जाहीर केलंय. त्यात राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. राष्ट्रवादीने केलेल्या आगळीकीला आमच्या कार्यकर्त्यांनी चोख उत्तर दिलंय. पण राज्यात असलेला दुष्काळ आणि बारावीच्या परीक्षा लक्षात घेता मनसे कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

तर अहमदनगरमध्ये झालेली दगडफेक ही पूर्वनियोजित होती. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय करणार होते हे पोलिसांना माहित होते पण पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. पोलिसांनी कारवाई का केली नाही? का बघ्याची भूमिका घेतली असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. तसंच मी पोलिसांच्या कारवाईला घाबरत नाही. कोणीही माझा आवाज दाबू शकत नाही. राज्य सरकारने झालेला प्रकार लक्ष्यात घ्यावा. खबरदारी म्हणून आता राज्य सरकार जालन्याच्या सभेला परवानगी देणार नाही अशी नेहमीच पद्धत आहे. पण त्यांनी सभेला परवानगी नाकारूनच दाखवावं असं आव्हानही राज यांनी दिलंय. या संपूर्ण प्रकरणावर जालन्याच्या सभेत योग्य उत्तर देऊ असंही राज यांनी स्पष्ट केलं.

==================================================

संबंधित बातम्या

==================================================

'इंजिन' धडकले 'घड्याळा'वर ! हा गडी बावचळलाय-अजित पवार 'नौटंकी करणार्‍यांना जशास तसे उत्तर देऊ' केंद्राच्या समितीकडून दुष्काळी भागाची पाहणी 'दगडफेक पूर्वनियोजित होती' मनसे कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ले ही नवनिर्माण सेना नाही तर गुंड निर्माण सेना -मलिक उद्धव ठाकरेंनी घेतली राजची बाजू जशाच तसे उत्तर देऊ -राम कदम मनसे कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ले

==================================================

close