महिला क्रिकेट वर्ल्डकपवर भारत-पाक तणावाचं सावट

January 17, 2013 12:16 PM0 commentsViews: 11

17 जानेवारी

भारत पाकिस्तानमधला तणाव वाढत असताना आता भारतानं पाकिस्तानच्या हॉकीपटूंना परत पाठवलं आहे. तर आता महिला क्रिकेट वर्ल्डकपवरही या तणावाचं सावट आहे. पाकिस्तान टीम मुंबईत खेळणार असलेल्या सर्व मॅचेस इतर शहरांमध्ये खेळवल्या जाण्याची शक्यता आहे. कोलकाता आणि बंगळुरू या शहरांच्या नावांवर चर्चा सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिलीये. तर या स्पर्धेचं भवितव्य पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळणार का यावर अवलंबून आहे. जर या खेळाडूंना भारतानं व्हिसा दिला नाही तर ही स्पर्ध पुढे ढकलली जाऊ शकते किंवा भारताबाहेर खेळवली जाऊ शकते अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे.

close