युवराज जम्बोच्या प्रमोशनला

December 5, 2008 4:38 PM0 commentsViews: 3

5 डिसेंबर दिल्ली इंग्लंडविरुध्दच्या धडाकेबाज कामगिरीनं भारतीय टीमचा स्टार बॅटसमन युवराज सिंग सध्या चांगलाच फॉर्मात आहे. याच जोरावर त्याची टेस्ट टीममध्येही निवड झाली आहे. त्याची क्रेझ जेवढी मैदानावर तेवढीच मैदानाबाहेरही. नुकताच तो दिल्लीत आला होता एका नव्या अ‍ॅनिमेशनपटाच्या प्रमोशनसाठी. जम्बो ह्या अ‍ॅनिमेशनपटाच्या प्रमोशनसाठी. या चित्रपटाला बॉलिवुड स्टार अक्षय कुमारचा आवाज लाभला आहे. या चित्रपटाचं नुकतंच प्रमोशन झालं. आणि यासाठी बोलवण्यात आलं होतं भारतीय क्रिकेट टीममधला मिस्टर सिक्सर युवराज सिंगला. हा कार्यक्रम जणू युवराजची टेस्ट टीममध्ये निवड साजरी करत होता.खास वेळ काढून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेला युवराज क्रिकेटच्या प्रॅक्टिससाठी जास्तीत जास्त वेळ देतोय. कारण आता त्याचं लक्ष आहे ते इंग्लंडविरुध्दच्या टेस्ट सीरिजवर.

close