हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी त्यागींवर गुन्हा दाखल

March 13, 2013 11:38 AM0 commentsViews: 12

13 मार्च

दिल्ली : ऑगस्टावेस्टलँड कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या 12 हेलिकॉप्टर खरेदीमध्ये लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने आज माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यागी यांच्या तीन चुलत भावांवरही आरोप ठेवण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची विविध कलमं लावण्यात आली. ऑगस्टावेस्टलँड ज्या कंपनीची उपकंपनी आहे त्या फिनमेकॅनिका आणि एअरोमॅट्रिक्स या कंपन्यांच्या कार्यालयांवर तसेच एस. पी. त्यागी यांच्या घरावर छापेही टाकण्यात आले. हा खरेदी करार 3600 कोटी रुपयांचा होता, त्यामध्ये 360 कोटी रुपये लाचेपोटी देण्यात आले होते असा आरोप आहे.

close