आणखी एक ‘नाट्य’, बोगसपत्रिकांची CID चौकशीची मागणी

February 25, 2013 11:53 AM0 commentsViews: 7

25 फेब्रुवारी

ग्रामपंचायत निवडणुकांनाही लाजवेल अशा थाटात पार पडलेली नाट्यपरिषदेची निवडणुकांचा आता तिसर्‍या अंकाला सुरूवात झाली आहे. मुंबईत निवडणुकीत मतमोजणी दरम्यान बनावट मतपत्रिका सापडल्या होत्या. या बनावट मतपत्रिकांचा सूत्रधार कोण हे शोधून काढण्यासाठी नटराज पॅनेलच्या विनय आपटे यांनी या घटनेची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे केली आहे. या प्रकरणातील खर्‍या सूत्रधाराला पकडून त्याला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी विनय आपटेंनी या विनंतीपत्रात केली आहे. विशेष म्हणजे या मागणीला विनय आपटेंच्या विरोधी गटाचे म्हणजेच उत्सफूर्त पॅनलच्या मोहन जोशींनीही पाठिंबा दिला आहे. मोहन जोशी यांनीसुद्धा गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेतली. दरम्यान, शिवाजी पार्क पोलिसांनी सापडलेल्या 1999 बोगस मतपत्रिकांचा तपास केला असता त्यात सर्वात जास्त बोगसपत्रिका मोहन जोशींच्या उत्सफूर्त पॅनलला मिळाल्या आहेत अशी माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे मुंबईतील रद्द झालेली मतमोजणी मंगळवारी परत सुरू करण्यात येणार असून मुंबईतील 16 जागांचे निकालही मंगळवारीच जाहीर होतील.

close