शहीद हेमराजचे शीर परत मिळवण्यासाठी गावकर्‍यांचे उपोषण

January 12, 2013 4:41 PM0 commentsViews: 6

12 जानेवारी

लान्स नाईक हेमराज यांच्या कुटुंबीयांनी आणि त्यांच्या गावातील नागरिकांनी हेमराजचं शीर परत द्यावं अशी मागणी केलीय. या मागणीसाठी गावकरी आणि कुटुंबीयांनी उपोषण केलं. मथुरा जिल्ह्यातील 29 वर्षीय हेमराज यांचा पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यांना मारल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी त्यांचं शीर नेण्याचं घृष्णास्पद कृत्य केलं होतं. त्याचा सर्व स्तरातून कठोर निषेध होतोय. मागील आठवड्यात हेमराज यांच्यावर अंत्यसंस्कार झाले पण यावेळी मुख्यमंत्री अखिलेश यादव तर दूरच साधा सरकारी कर्मचारीही हजर नव्हता. राज्य सरकारच्या अशा वागण्यामुळे आम्हाला दुखद धक्का लागलाय. आमचे अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्री आले नाही ना सरकारी कर्मचारी आला. शहीद सुधाकर सिंह यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान खुद्द उपस्थित होते पण इथं कोणीही आलं नाही अशी व्यथा शहीद हेमराज यांच्या भावाने मांडली. मात्र सपाचे प्रवक्ते कुशवाह यांनी शहीद कुटुंबीयांचे आरोप चुकीचे आहे असं म्हटलंय. अखिलेशयादव यांनी शहीदांच्या कुटुबीयांना 20 लाखांची मदत जाहीर केलीय पण अंत्यसंस्काराच्या वेळी अखिलेश यादव व्यस्त असल्यामुळे येऊ शकले नाही असा खुलासा केला.

close