आश्वासनानंतर सुरेश खाडेंनी उपोषण सोडले

February 5, 2013 9:49 AM0 commentsViews: 7

05 फेब्रुवारी

मिरजेत आमदार सुरेश खाडे यांनी 5 दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण आज सोडलं. त्यांच्या उपोषणाची दखल घेत सरकारने मिरज पूर्व भागातल्या दुष्काळग्रस्त गावांसाठी 8 कोटींचा निधी देण्याचं आश्वासन दिलं आहे. वनमंत्री पतंगराव कदम, गृहमंत्री आर. आर. पाटील, विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे यांची आज मंत्रालयात बैठक झाली. त्यात कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत म्हैसाळ योजनेची कामं लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं. तसेच त्यासाठी 8 कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा फॅक्स खाडे यांना पाठवण्यात आला. त्यानंतर खाडेंनी आपलं उपोषण मागे घेतलं.

close