अंधेरीत कारच्या धडकेत दोन महिला ठार

January 22, 2013 10:30 AM0 commentsViews: 19

22 जानेवारी

मुंबईत अंधेरीतील जोगेश्वरी – लिंक रोडवर भरधाव इंडिका कारने 6 महिलांना धडक दिली. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झालाय. संगीता वानन आणि रेखा होनाळे अशी दोघींची नावं आहेत. सिप्झ कंपनीच्या गेट नं 3 समोर ही घटना घडली. सकाळी 6 वाजता मार्निंग वॉकला निघालेल्या या महिलांना भरधाव वेगात आलेल्या इंडिका कारने जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, जागेवरच संगीता वानन आणि रेखा होनाळे या महिलांचा मृत्यू झाला. तर इतर जखमी महिलांना होलीक्रॉस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी गाडीचा ड्रायव्हर प्रविण कनोजियाला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय.

close