हैदराबाद बॉम्बस्फोट:NIAचे औरंगाबाद,नांदेड आणि बीडमध्ये छाप

February 22, 2013 11:07 AM0 commentsViews: 3

22 फेब्रुवारी

हैदराबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा आणि महाराष्ट्रात झालेल्या स्फोटांचा संबंध असल्याची माहिती मिळतेय याच संबंधात नांदेड, बीड, औरंगाबादमध्ये एनआयएनं छापे टाकले आहे. मराठवाड्यातल्या नांदेड,बीड आणि औरंगाबाद या शहरात सीमी आणि अतिरेकी संघटनांचं जाळं असल्याचं या अगोदर तपासातून निष्पन झालं होतं. राज्यातल्या स्फोटांशी हैदराबाद स्फोटाचे साम्य आहे का याचा शोध सुरू आहे. दरम्यान, पुण्यातील जंगली महाराज रोडवरील बॉम्बस्फोटातील अटकेत असलेल्या आरोपींचीही चौकशी होणार आहे. तर महाराष्ट्र एटीएसने फरार घोषित केलेल्या चार दहशतवाद्यांपैकी काहींनी हा स्फोट केल्याचा संशय आहे तर याच अतिरेक्यांपैकी काहींनी मुंबईतील 12 ठिकाणांची रेकी केल्याचाही संशय व्यक्त करण्यात येतोय.

close