मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसाठी हालचालींना वेग

March 11, 2013 9:36 AM0 commentsViews: 44

11 मार्च

दिल्ली : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आता हालचालींना वेग आला आहे. यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी मुलाखती सुरू केल्या आहेत. संभाव्य उमेदवारांबरोबरच मुंबईतल्या मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांची प्रत्यक्ष भेट राहुल गांधींनी घेतली. दिल्लीतल्या तुघलक रोडवरच्या आपल्या निवासस्थानी राहुल गांधींनी काही काँग्रेस नेत्यांना बोलावलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आठवडाभरात राहुल गांधींना मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष नेमायचा आहे, त्यासाठी काँग्रेस आमदार मधु चव्हाण, माजी आमदार जनार्दन चांदुरकर आणि आमदार भाई जगताप यांची नावं आघाडीवर आहेत. आज राहुल गांधी यांनी या संभाव्य उमेदवारांबरोबरच सुरेश शेट्टी, नसीम खान आणि वर्षा गायकवाड या तीन मंत्र्यांशीही प्रत्यक्ष चर्चा केली. पण मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाकरिता आमदार मधु चव्हाण यांचं नाव आघाडीवर आहे तर डार्क हाँर्स म्हणुन भाई जगताप यांचही पारडं जड आहे.

close